नागपूर: यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधला सगळ्यात मोठा ऐतिहासिक क्षण नागपूरमध्ये पाहायला मिळाला. ग्रुप स्टेजमधल्या शेवटच्या मॅचमध्ये अफगाणिस्ताननं वेस्ट इंडिजचा 6 रननी पराभव केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव झाला असला तरी पॉईंट्स टेबलमध्ये वेस्ट इंडिज पहिल्या क्रमांकावरच राहिला आहे. यामुळे आता भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये जो जिंकेल तो वेस्ट इंडिजविरुद्ध सेमी फायनलमध्ये खेळेल. 


या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 123 रन बनवता आल्या. नाझिमुल्ला झादराननं सर्वाधिक 48 रन बनवल्या. 


124 रनचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिजला क्रिस गेलची कमी जाणवली. सुरवातीपासूनच वेस्ट इंडिज डगमगताना दिसली, अखेर 20 ओव्हरमध्ये त्यांना 117 रनपर्यंतच मजल मारता आली.