नवी दिल्ली : भारताचा कुस्तीपटू नरसिंह यादव याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. नरसिंह यादवने नाडाकडून दिलासा मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते. 


सोमवारी पत्रकार परिषदेत बोलतांना त्याने म्हटलं की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे कारण त्यांच्यामुळे मी रिओ ओलंपिकला जावू शकणार आहे. नाडाने त्याच्यावर असलेली बंदी उठवली आहे. नॅशनल डोपिंग एजन्सी  म्हणजेच 'नाडा'ने अखेर नरसिंग यादवला डोपिंग प्रकरणी क्लिन चीट दिल्याने त्याचा रिओ ऑलिम्पिकसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.