मुंबई: भारतीय संघाचा स्टार बॅट्समन अजिंक्य रहाणेची क्रिकेटच्या मैदानावरील उल्लेखनीय कामगिरी तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण रहाणे क्रिकेटबरोबरच आणखी एका खेळामध्ये माहिर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कराटेमध्ये अजिंक्य रहाणेला ब्लॅक बेल्ट मिळाला आहे. अजिंक्य रहाणेनं एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा उलगडा केला आहे. कराट्यांमुळेच मला क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी मदत झाली असं अजिंक्य म्हणाला आहे.


कराट्यांमुळे मला फ्लेक्जिबलिटी आणि फिटनेस वाढवायला मदत झाली, कराटे खेळताना मी एकाच वेळी 50 वीटा तोडल्या, एवढच नाही तर 50 जण माझ्या पोटावर पडले, यामुळे मला मानसिक मजबुती मिळाली आणि कठीण काळातही मजबूत राहणं मी कराट्यांमुळेच शिकलो, असं रहाणे म्हणाला आहे.


काय म्हणाला अजिंक्य पाहा व्हिडिओ