लंडन : भारत विरोधात टेस्ट, वनडे आणि टी-20 मध्ये पराभव झाल्यानंतर इंग्लंडच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे. इंग्लंडचा टेस्टच फॉरमॅटचा कर्णधार अॅलेस्टर कूकने राजीनामा दिला आहे. 5 वर्षापासून कूक इंग्लंडचं नेतृत्व करत होता. 



कूकच्या नेतृत्वात इंग्लंडने 2013 आणि 2015 साली झालेल्या अॅशेस सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका यांना देखील इंग्लंडने पराभवाचा धक्का दिला.