अमिताभचा फ्लिंटॉफला ट्विटरवरुन टोमणा
टी-२० वर्ल्डकपमध्ये ज्याप्रमाणे वेस्ट इंडिज खेळला त्यानंतर सर्वत्र त्यांच्या संघाचे कौतुक केले जातेय. त्याचबरोबर त्यांच्यावर जोक्सही सुरु आहेत. यात बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे.
मुंबई : टी-२० वर्ल्डकपमध्ये ज्याप्रमाणे वेस्ट इंडिज खेळला त्यानंतर सर्वत्र त्यांच्या संघाचे कौतुक केले जातेय. त्याचबरोबर त्यांच्यावर जोक्सही सुरु आहेत. यात बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे.
वेस्ट इंडिजच्या विजयानंतर अमिताभ यांनी ट्वीट करुन इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफला चांगलाच टोमणा मारला. या ट्विटमध्ये त्यांनी उखाड़ के रख दिया जड़ से...वेस्ट इंडीज असली चैम्पियन है। असं म्हटलंय.
याआधी माजी क्रिकेटपटू फ्लिंटॉफने विराट कोहलीची ज्यो रुटशी तुलना केली होती. यावर त्यांनी उत्तर देताना कोण आहे हा रुट, आम्ही याला मुळासकट उखडून टाकू. असे म्हटले होते.