कटक :  भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगने तब्बल पाच वर्षांनंतर म्हणजे २०११ च्या वर्ल्ड कपनंतर पहिली सेंच्युरी लगावली. दीर्घकाळानंतर आपला फॉर्म गवसला त्यामुळे युवराज सिंग अत्यंत भावुक झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. 


पाहा सेंच्युरी झाल्यावर भावुक झालेला युवराज 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



युवराजचं वनडे क्रिकेटमधली ही 14वी सेंच्युरी आहे, तर इंग्लंडविरुद्धची ही त्याची चौथी सेंच्युरी आहे. 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेंच्युरी झळकवायला युवराजला तब्बल पाच वर्ष नऊ महिने आणि 30 दिवसांची वाट पाहावी लागली होती. याधी युवराजनं 2011च्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये सेंच्युरी झळकावली होती. 


याआधी धोनी आणि युवराजमध्ये 50 रनपेक्षा जास्तची पार्टनरशीप 2011 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये झाली होती.