ब्रिटनचा अँडी मरे विम्बल्डनचा चॅम्पियन
ब्रिटनच्या अँडी मरेनं कॅनडाच्या मिलोच राओनिचचा पराभव करत विम्बल्डनवर आपलं नाव कोरलं.
लंडन : ब्रिटनच्या अँडी मरेनं कॅनडाच्या मिलोच राओनिचचा पराभव करत विम्बल्डनवर आपलं नाव कोरलं. फायनलच्या लढतीत मरेनं राओनिचवर 6-4, 7-6, 7-6 नं पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली.
या विजयासह मरेनं दुस-यांदा विम्बल्डन अजिंक्यपद पटाकवलं. याआधी मरेनं 2013 मध्ये विमब्ल्डनच्या खिताबावर आफलं नाव कोरलं होतं. तर त्याच्या टेनिस करिअरमधील हे तिसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरलं आहे.