सचिनची विकेट घेणारा तो खेळाडू आता चालवतोय टॅक्सी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर बहुतेक क्रिकेटपटू कॉमेंट्री करतात
सिडनी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर बहुतेक क्रिकेटपटू कॉमेंट्री करतात, काही जण स्वत:चा व्यवसाय सुरु करतात किंवा क्रिकेट बोर्डाचे सल्लागार, कोच किंवा निवड समितीमध्ये काम करतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू निवृत्त झाल्यानंतर सुखाचं आयुष्य जगतात हा बहुतेकांचा समज असतो, पण पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अर्शद खान याला अपवाद आहे.
पाकिस्तानसाठी 9 टेस्ट आणि 58 वनडे खेळणारा अर्शद खान आता ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये टॅक्सी चालवत आहे. 1997 ते 2006 मध्ये अर्शद पाकिस्तानसाठी खेळला आहे. अर्शद खाननंच पेशावरमध्ये झालेल्या वनडेमध्ये सचिन तेंडुलकरची विकेट घेतली होती. सचिननं या वनडेमध्ये सेंच्युरी मारली होती.
गणेश बिर्ले या सिडनीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीनं अर्शद खानची ही अवस्था सोशल नेटवर्किंगवर शेअर केली आहे. सिडनीमध्ये मी एका उबेर टॅक्सीमध्ये बसलो. टॅक्सीमध्ये बसल्यानंतर ड्रायव्हर माझ्याशी गप्पा मारायला लागला. हैदराबादमध्ये बरेच वेळा मी क्रिकेट खेळण्यासाठी आल्याचं मला सांगितलं. मी त्याला त्याचं पूर्ण नाव विचारल तेव्हा त्यानं अर्शद खान नाव सांगितलं. हे नाव ऐकून मला धक्का बसला, असं गणेशनं सांगितलं आहे.
गणेशनं शेअर केलेला अर्शदचा फोटो