मुंबई: बीसीसीआयनं पाकिस्तानी अंपायर असद रौफ यांच्यावर 5 वर्षांची बंदी घातली आहे. 2013 च्या आयपीएलमध्ये असद रौफ यांनी मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला होता. असद रौफ यांच्यावर बंदी घालण्याचा या निर्णय बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी 2013 मध्ये रौफ यांनी मुंबईमध्ये चौकशीसाठी यायला नकार दिला होता. माझा भारतातल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, पण मुंबई पोलिसांवर नाही, त्यामुळे मी भारतात येत नाही, असं रौफ म्हणाले आहेत. मी भारतामध्ये येत नसलो तरी माझे वकिल चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य करत असल्याचंही रौफ म्हणाले होते.


 मॅच फिक्सिंग प्रकरणामध्ये आरोप झाल्यामुळे असद रौफ यांची चॅम्पियन्स ट्रॉफीचं अंपायरचं पॅनल आणि आयसीसी अंपायरच्या इलाईट पॅनलमधून आधीच हकालपट्टी झाली आहे.