आशिष नेहराचा दिलदारपणा, बेघर प्रशिक्षकाला दिलं घर
भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहराचा दिलदारपणा समोर आला आहे. आशिष नेहरानं बेघर होत असलेल्या त्याच्या प्रशिक्षकाला घर घेऊन दिलं आहे.
नवी दिल्ली : भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहराचा दिलदारपणा समोर आला आहे. आशिष नेहरानं बेघर होत असलेल्या त्याच्या प्रशिक्षकाला घर घेऊन दिलं आहे. विराट कोहलीच्या 'ड्रिव्हन- द विराट कोहली स्टोरी' या पुस्तकामध्ये याबाबत उलगडा करण्यात आला आहे.
तारक सिन्हा हे आशिष नेहराचे प्रशिक्षक होते. आर्थिक चणचणीमुळे सिन्हांना त्यांचं भाड्याचं घर सोडायची वेळ आली होती. हे आशिष नेहराच्या लक्षात आल्यानंतर तो सिन्हांच्या मदतीला धावला. नेहरानं सिन्हांना फक्त नवीन घरच दिलं नाही तर भविष्यात तारक सिन्हांना आर्थिक चणचण भासू नये म्हणूनही त्यानं तरतूद केली आहे. दिल्लीमध्ये क्रिकेटचं कोचिंग करणारे तारक सिन्हांनी आशिष नेहराबरोबरच शिखर धवन, आकाश चोप्रा, रिषभ पंत आणि अंजूम चोप्रा यांनाही क्रिकेटचं प्रशिक्षण दिलं आहे.