`अश्विनने अनेकदा कठीण काळात मदत केली आहे`
भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनची स्तुती करताना अश्विन हा असा गोलंदाज आहे ज्याने अनेकदा संघाला समस्येतून बाहेर काढले आहे. धोनीने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अश्विनला केवळ एक ओव्हर दिली. या सामन्यात पुण्याने नऊ विकेट राखून विजय मिळला.
मुंबई : भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनची स्तुती करताना अश्विन हा असा गोलंदाज आहे ज्याने अनेकदा संघाला समस्येतून बाहेर काढले आहे. धोनीने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अश्विनला केवळ एक ओव्हर दिली. या सामन्यात पुण्याने नऊ विकेट राखून विजय मिळला.
टी-२० वर्ल्डकपपासून धोनी आणि अश्विन यांच्यातील मतभेदावर स्पष्टीकरण देताना धोनी म्हणाला, जसे मी म्हणालो आहे अश्विनने अनेकदा संघाला कठीण प्रसंगातून बाहेर काढले आहे. भले पहिले सहा ओव्हर असो वा अंतिम ओव्हर. तो असा गोलंदाज आहे जो कोणत्याही वेळेस चांगली गोलंदाजी करु शकतो. अश्विन परिपक्व गोलंदाज आहे. तो कधीही गोलंदाजी करु शकतो.
मुंबई इंडियन्सच्या संघाने सुरुवातीच्या पाच ओव्हरमध्ये ३० धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे धोनीने विचार केला की लेगस्पिनर मुरुगन अश्विनला पूर्ण चार ओव्हर देऊन या युवा क्रिकेटपटूच्या मनातील भिती दूर करण्याची हीच वेळ आहे.
यावर बोलताना धोनी म्हणाला, ही वेळ अश्विनला गोलंदाजी देण्याची चांगली वेळ होती. तुम्ही मॅच पाहिलीच असेल तो असा गोलंदाज नाही जो शॉर्ट चेंडू टाकेल. मात्र त्याच्यावर दबाव होता. त्यामुळे मला वाटले की त्याला चार ओव्हर दिल्यास दुसऱ्या अथवा तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याला आत्मविश्वास मिळेल. ही त्याच्यावर विश्वास टाकण्याची प्रक्रिया होती. दुसरीकडे रजत भाटिया चांगली गोलंदाजी करत होता. याचमुळे अश्विनला एक ओव्हर देण्यात आली. त्यानंतर मी विचार केला वेगवान गोलंदाजांना संधी देणे योग्य ठरेल.
धोनीने ३१ मार्च रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सेमीफायनलमध्येही अश्विनचा वापर कमी केल होता. त्यानंतर पहिल्या सामन्यातही अश्विनला एक ओव्हर देण्यात आली. यावरुन त्यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र सामन्यानंतर धोनीने एक ओव्हर देण्याचे स्पष्टीकरण दिले.