मुंबई: भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन आयसीसीनं प्रसिद्ध केलेल्या टेस्ट क्रिकेटमधल्या बॉलरच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. पण टॉप 10 बॅट्समनमध्ये एकही भारतीय खेळाडूचं नाव नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विन हा 871 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड 872 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या हेडिंग्ली टेस्टमध्ये 10 विकेट घेणारा इंग्लंडचा अंडरसन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 


टॉप बॅट्समनच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर इंग्लंडचा जो रुट, न्यूझिलंडचा केन विलियमसन, दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आणि पाकिस्तानचा यूनुस खान आहे. 


ऑल राऊंडरच्या रॅकिंगमध्येही अश्विन पहिल्या क्रमाकांवर आहे. त्याच्यानंतर बांग्लादेशच्या शाकिब अल हसन दुसऱ्या क्रमांकावर आहे.