आशिया कप : भारत-बांगलादेश यांच्यात आज सलामीची लढत
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील आशिया कपची सलामीची लढत बांग्लादेशमधल्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर आज रंगेल.
ढाका : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील आशिया कपची सलामीची लढत बांग्लादेशमधल्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर आज रंगेल.
कॅप्टन महेंद्रसिंग धोनी दुखापतग्रस्त झालाय. पार्थिव पटेलला त्यामुळे टीम इंडियात समावेश करण्यात आलाय. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला. आता भारतीय टीम आपली विजयी मालिका कायम राखते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आशिया कप धोनी अँड कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मावर धडाकेबाज ओपनिंग करुन देण्याची जबाबदारी असेल. त्याचप्रमाणे इनफॉर्म बॅट्समन विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा असतील. बॉलिगंमध्ये आर. अश्विनवर भारताची सारी भिस्त असेल. फास्ट बॉलिंगमध्ये आशिष नेहराला बांग्लादेशच्या बॅट्समनना रोखावं लागेल.