इस्लामाबाद : आशिया चषक आणि टी २० विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. दरम्यान, मैदानावर क्रिकेट युद्ध ज्या दोन टीममध्ये होते, त्यांच्यात एकमेकांना मैदानावर हरवायचे कसे, याचे डावपेज खेळले जात आहेत. पाकिस्तानने नवी चाळ खेळण्याची तयारी केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकने आपल्या अनुभवी खेळाडूंना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतलाय.  जखमी बाबर आझम आणि रुम्मान रईस यांच्या जागी शर्जिल खान आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सामी यांचा संघात समावेश केलाय.
 
तसेच इफ्तिखार अहमदच्या जागी खालिद लतीफला टीममध्ये संधी दिली आहे. सराव सामन्यादरम्यान आझमच्या हाताला दुखापत झाली, तर रईसला स्नायूदुखीचा त्रास बलावलाय, त्यामुळे या खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेय.



 
शर्जिल, सामी आणि लतीफने सध्या सुरु असलेल्या पीसीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना संघात समावेश केल्याचं पाकिस्तानच्या निवड समितीचे अध्यक्ष हारुन रशीद यांनी सांगितलं. मोहम्मद सामीने भारताविरुद्ध नेहमीच उत्तम कामगिरी केली आहे. 
 
शर्जिल खान, सामीचं यांचा चांगला खेळ पाहून कर्णधार शाहिद आफ्रिदी, मुख्य प्रशिक्षक वकार युनूस यांनी त्यांची निवड केलीय. शर्जिलने डिसेंबर २०१३ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला आहे. तर सामीने तब्बल ३ वर्षानंतर २०१५ मध्ये पाकिस्तानी संघात पुनरागमन केले आहे.