भोपाळ : राष्ट्रीय स्तरावरची अॅथलिट पूजा कुमारीचा सेल्फी काढताता मृत्यू झाला आहे. भोपाळमधल्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सेंटरमध्ये पूजा सेल्फी काढत होती. हा सेल्फी काढताना पाय घसरून पूजा मत्स्यपालनाच्या तलावात पडली. या तलावात बुडून पूजाचा मृत्यू झाला. पोहता येत नसल्यामुळे पूजाला स्वत:ला वाचवता आलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजाबरोबर तिच्या मैत्रिणीही होत्या, पण त्यांनाही पोहता येत नव्हतं. पूजाला मदत करायला बोलवण्यासाठी तिच्या मैत्रिणी वसतीगृहाकडे गेल्या, पण पूजाचा मृत्यू झाला. 


पूजा कुमारीही हर्डल रेसची राष्ट्रीय खेळाडू होती. उत्तराखंडची असलेली पूजा मागच्या तीन वर्षांपासून सेंटरमध्ये स्टीपल चेजचं प्रशिक्षण घेत होती. मागच्या वर्षी तिला स्टीपल चेजच्या राष्ट्रीय स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळालं होतं.