बंगळुरुमध्येही पुण्याची पुनरावृत्ती, कांगारू मजबूत स्थितीत
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने दुस-या कसोटीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 189 धावात आटोपला.
बंगळुरू : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने दुस-या कसोटीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 189 धावात आटोपला. दिवसअखेर ऑस्ट्रेलीयाने नाबाद 40 धावा केल्यात.
भारताकडून लोकेश राहूल वगळता एकाही भारतीय खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. लोकेश राहूलने एक बाजू लावून धरत 90 धावा केल्या. नॅथन लायनच्या फिरकीसमोर भारतीय संघाने सपशेल लोटांगण घातलं. लियॉ़नने तब्बल 8 खेळाडूंना तंबूत परत पाठवलं. भारताच्या पहिल्या डावात लोकेश राहूल आणि चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 61 धावांची भागिदारी केली. कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे लायनच्या फिरकीचे बळी ठरले.