ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २७६ धावांवर संपुष्टात
भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २७६ धावांवर गुंडाळण्यात भारताला यश आलेय.
बंगळूरु : भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २७६ धावांवर गुंडाळण्यात भारताला यश आलेय.
तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी झटपट ४ विकेट घेतल ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात ८७ धावांनी आघाडीवर आहे.
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने सावध भूमिका घेत खेळ केला होता. ते पाहता तिसऱ्या दिवशी त्यांच्या धावसंख्येत मोठी भर पडणार असे वाटत होते. मात्र रविंद्र जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे काही चालले नाही. जडेजाने तब्बल ६ विकेट घेत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या रोखण्यात यश मिळवले.
भारताच्या दुसऱ्या डावाला आता सुरुवात होणार आहे. सामन्यात परतायचे असल्यास भारताला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारणे गरजेचे आहे.