नवी दिल्ली :  महिलांच्या टी-२० वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लडचा पाच धावांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरूवातीला फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने ६ बाद १३२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून लॅनिनने ५५ धावांची शानदार खेळी केली. तर इंग्लडकडून सिव्हर हिने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. 


 ऑस्ट्रेलियाच्या १३२ धावांचा पाठलाग करताना  इंग्लडचा संघ ७ बाद १२७ धावाच करू शकला. इंग्लडची सुरूवात चांगली झाली पण १३ षटकानंतर जी पडझड सुरू झाली त्यामुळे खालचे फलंदाज प्रेशन हँडल करू शकले नाही.