ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टेस्टला आजपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रांचीमध्ये ही पहिल्यांदा टेस्ट मॅच होत आहे.
रांची : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टेस्टला आजपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रांचीमध्ये ही पहिल्यांदा टेस्ट मॅच होत आहे.
रांची टेस्टसाठी टीम इंडियामध्ये एक बदल करण्यात आला आहे. अभिनव मुकुंदच्या जागी मुरली विजयला प्लेइंग इलेवनवर स्थान देण्यात आलं आहे. विजय हा दुखापतीमुळे मागच्या टेस्टमधून बाहेर झाला होता.
ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये दुखापतीमुळे मिशेल स्टार्क आणि मिशेल मार्शच्या जागी ग्लेन मॅक्सवेल आणि पैट कमिंसला सहभागी करण्यात आलं आहे.
भारतीय टीम
मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, करुण नायर, आर. अश्विन, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, उमेश यादव आणि इशांत शर्मा.
ऑस्ट्रेलिया टीम
डेविड वॉर्नर, मॅट रैनशॉ, स्टीव स्मिथ, शॉन मार्श, पीटर हँड्सकॉम्ब, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड, स्टीव ओकीफे, नाथन लियोन, पैट कमिंस आणि जोश हेजलवुड.