बंगळूरु : बंगळुरु कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने विराट कोहलीवर जोरदार टीका केली. या सामन्यात दोन्ही संघादरम्यान वादही झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे वाद शांत होत नाहीत तोच शुक्रवारी ऑस्ट्रेलियन मीडियाने नवा वाद निर्माण केलाय. फॉक्स स्पोर्टने शुक्रवारी एक ऑनलाईन पोल चालवला होता. यात आठवड्याचा स्पोर्टस व्हिलन निवडण्यास सांगितले होते. यात विराट कोहलीसह इतर ऑप्शन म्हणून एक कुत्रा, मांजर आणि पांडा होते. 


दरम्यान फॉक्स स्पोर्ट्स या पोलला मोठा विरोधही झाला. अशाप्रकार भारतीय खेळाडूचा अपमान केल्याची टीकाही करण्यात आलीये. 


बंगळुरु कसोटी भारताच्या विजयापेक्षा गाजली ती ऑस्ट्रेलियाने डीआरएस घेण्याच्या प्रकरणामुळे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने डीआरएस घेताना ड्रेसिंग रुमकडे पाहिले आणि यामुळे विवाद सुरु झाला. स्मिथच्या या वर्तणुकीमुळे विराटही चांगलाच भडकला होता. दिग्गज क्रिकेटपटूंनीही याप्रकरणी स्मिथवर टीका केली.