मेलबर्न : अव्वल सीडेड अँजेलिक कर्बरनं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयानं सुरुवात केली. तिनं युक्रेनच्या बिगरमानांकित लेसिया सुरेन्कोवर मात केली. कर्बरनं 6-2, 5-7, 6-2 नं आपली पहिली लढत जिंकली. अमेरिकन जायंट सेरेना विल्यम्ससाठी कर्बरचाच सर्वात मोठा अडथळा या टुर्नामेंटमध्ये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड नंबर वन ब्रिटनच्या अँडी मरेला विजयासाठी झगडावं लागलंय. युक्रेनच्या ईल्या मार्चेन्कोवर त्यानं संघर्षपूर्ण लढतीत 7-5, 7-6, 6-2 नं विजय मिळवला. पहिले दोन सेट टायब्रेकरमध्ये गेल्यानंतर त्यानं शेवटचा सेट 6-2 नं सहज जिंकत बाजी मारली. 


स्वित्र्झर्लंडच्या रॉजर फेडररनं आपल्या आवडत्या हार्ड कोर्टवर दिमाखात कमबॅक केलं.ऑस्ट्रियाच्या जर्गन मेल्झरचा त्यानं 7-5, 3-6, 6-2, 6-2 नं पराभव केला. विम्बल्डनंतर टेनिसकोर्टवर उतरणा-या फेडररनं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयी सलामी देत आपली दावेदारी आणखी मजबूत केलीय. 


ऑस्ट्रेलिय़ऩ ओपनच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक चर्चा रंगली ती लोकल बॉय अॅलेक्स डी मिनारुची.... 17 वर्षीय या युवा टेनिसपटूनं आपल्या खेळानं सा-यांची मनं जिंकली. त्यानं त्यानं ऑस्ट्रियाच्या जेराल्ड मेल्झरला 5-7,6-3,2-6,7-6,6-1 नं पराभवाचा धक्का दिला. 


वुमेन्स सिंगल्समध्ये चौथ्या सीडेड सिमोना हालेपला आपला गाशा गुंडाळावा लागला. तिला सलामीच्या लढतीत अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सनं 6-3, 6-1 पराभूत केलं. ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच दिवसाचा हा मेडर अपसेट ठरला.