मेलबर्न : विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचं वर्ल्डकप टी-२० मधील सेमीफायनलचं स्वप्न संपूष्टात आणलं. विराटने पुन्हा एकदा उत्कृष्ट खेळी करत ऑस्ट्रेलियाला पराभवाची धुळ चारली. आणि जगभरातून विराटवर कोतुकाचा वर्षाव सुरु झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरातून विराटचं कौतूक होत असतांना ऑस्ट्रेलियातील मीडियाने देखील विराटचं तोंडभरून कौतूक केलं आहे. ऑस्ट्रेलियातील मीडिया कोणाचंही एवढं कधी कौतूक करतांना याआधी दिसले नाही. 


ऑस्ट्रेलियातील अनेक दिग्गज क्रिकेट एक्सपर्ट्सने ही विराटला विश्वविजेता म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १६१ रन्सचं टार्गेट पूर्ण करतांना विराटने ५२ बॉलमध्ये ८२ रन्सची उत्कृष्ट खेळी केली होती.


हा 'विराट शो' होता


'करो या मरो'च्या या मॅचमध्ये भारतीय टीमने विजय मिळवत एक इतिहास रचला. सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या क्रिस बॅरेट यांनी 'कालची मॅच म्हणजे 'विराट शो' होता आणि तो जबरदस्त होता' असं म्हटलं आहे. 


'कोहली सारखा प्रतिभावंत नाही'


टी-20 आंतराष्ट्रीय सामन्यांमधली आतापर्यंतची सर्वात महान खेळी ही होती. या दिग्गज खेळाडूने एकट्याने ऑस्ट्रेलियाला टी-20 वर्ल्डकपमधून बाहेरचा रस्ता दाखवला. एका व्यक्तीने विजय मिळवून दिला. सध्या विश्वात विराट सारखा प्रतिभावंत दुसरा कोणी नाही. असं डेली टेलीग्राफच्या होर्ने यांनी म्हटलं आहे.