नवी दिल्ली : क्रिकेटजगतात नेहमीच काहीना काही रेकॉर्ड बनत असतात. रेकॉर्ड तुटत असतात. मात्र एका असा रेकॉर्ड बनलाय जो कोणी कधीच बनवू शकत नाही. मात्र या रेक़ॉर्डमुळे त्या खेळाडूवर दहा वर्षाची बंदी घालण्यात आलीये. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने प्रतिमा खराब केल्याच्या कारणावरुन ही कारवाई करण्यात आलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशमध्ये गेल्या महिन्यात ढाका सेकंड डिव्हीजन लीगमधील एका वनडे सामन्यादरम्यान ही घटना घडलीये. लालमातिया क्रिकेट क्लबच्या मोहम्मद सुजोन महमूदवर १० वर्षांची बंदी घालण्यात आलीये. सुजोनने ढाका लीगमधील एका सामन्यादरम्यान खराब अंपायरिंगला विरोध करताना ४ चेंडूत तब्बल ९२ धावा दिल्या. 


अशाच एका प्रकरणात फियर फायटर क्बलच्या तस्नीम हसनवरही १० वर्षांची बंदी घालण्यात आलीये. त्याने एका षटकांत ६९ धावा दिल्या होत्या. त्यानंतर या दोन्ही क्लबवर आजीवन बंदी घालण्यात आलीये. तर दोन्ही क्लबचे कर्णधार, मॅनेजर आणि प्रशिक्षकांवरही पाच-पाच वर्षांची बंदी घालण्यात आलीये.