आशिया कप फायनलमध्ये बांग्लादेशला हरविणे सोपे नाही : धोनी
गेल्या १० सामन्यात ९ विजय मिळविणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी सावधानतेचा इशारा दिलाय. आमचा संघ जगातील कोणत्याही टीमशी मुकाबला करु शकतो. संघ संतुलीत आहे. मात्र, बांग्लादेशला त्यांच्या घरच्या मैदानावर हरविणे कठिण आहे.
नवी दिल्ली : गेल्या १० सामन्यात ९ विजय मिळविणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी सावधानतेचा इशारा दिलाय. आमचा संघ जगातील कोणत्याही टीमशी मुकाबला करु शकतो. संघ संतुलीत आहे. मात्र, बांग्लादेशला त्यांच्या घरच्या मैदानावर हरविणे कठिण आहे.
एका बांग्लादेशी पत्रकाराने उलट-सूलट धोनीला प्रश्न केलेत. एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला, बांग्लादेशमध्ये खेळत आहात, त्यावेळी धोनी म्हणाला मी स्वत:ला एवढ्या लवकर मुक्ती देऊ शकत नाही. बांग्लादेशाला माझ्याशी पुन्हा सामना करावा लागणार आहे. बांग्लादेशला त्यांच्याच मैदानावर हरविणे कठिण आहे. बांग्लादेश संघ मजबूत आहे. त्यामुळे फायनलमध्ये रंगत येईल, असे धोनी म्हणाला.
संयुक्त अरब अमिरातवर ९ विकेटने विजय मिळविल्यानंतर धोनी म्हणाला, टी-२० टीम चांगली असून कोणत्याही परिस्थितीत चांगला खेळ करु शकते. ५० ओव्हरच्या सामन्याबाबत मी म्हणत नाही तर टी-२०बाबत करीत आहे. जगातील कोणत्याही टीमशी सामना करु शकेल अशीच आमची टीम आहे. आमच्याकडे तीन फास्ट बॉलर असून दोन स्पिनर आहेत. जरुर पडली तर त्यात थोडा बदल करु शकतो. तसचे ८ व्या स्थानापर्यंत बॅटिंग लाईन आहे. त्यामुळे टीम चांगली झालेय.