बांगलादेशची गुर्मी काही केल्या उतरेना!
गुरुवारी झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात भारताचा निसटता पराभव झाला. पण, एखाद्याने कोणाच्या विजयावर आणि कोणाच्या पराभवावर टिप्पणी करताना ती खिलाडूवृत्तीने करावी, अशी माफक अपेक्षा असते.
मुंबई : गुरुवारी झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात भारताचा निसटता पराभव झाला. पण, एखाद्याने कोणाच्या विजयावर आणि कोणाच्या पराभवावर टिप्पणी करताना ती खिलाडूवृत्तीने करावी, अशी माफक अपेक्षा असते.
भारताच्या झालेला पराभव ताजा असतानाच बांगलादेश क्रिकेटपटू मुशफिकर रहिमने एक ट्विट केलं आणि आधीच पराभवाच्या दुःखात असलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांचा पारा आणखीनच चढला. 'हा हा हा. भारत सेमीफायनलमध्ये हरला... यालाच आनंद म्हणतात' असं खोचक ट्वीट केलं. त्यानंतर वेस्ट इंडिजचं कौतुक करणारा सेल्फीही त्याने अपलोड केला.
त्याच्या या ट्वीट्सवर सर्व स्तरांतून टीका झाली. काहींनी तर भारताविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूत बांगलादेश कसा हरला, याची त्याला आठवण करुन दिली. या वादंगानंतर त्याने आपलं ट्वीट डिलीट केलं आणि भारतीय चाहत्यांची माफी मागितली.