ब्युनोस : अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या बचावासाठी बार्सिलोना क्लबचे सदस्य पुढे आलेत. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने मेस्सी आणि त्याच्या वडिलांना करचुकवेगिरीप्रकरणी २१ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र मेस्सीच्या समर्थनार्थ बार्सिलोना क्लबने #WeAreAllLeoMessi अशी मोहीम सुरू केली आहे. या हॅशटॅगखाली मेस्सीच्या चाहत्यांना मेस्सीचे समर्थन करून त्याला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  


बार्सिलोना क्लबचे अध्यक्ष जोसेफ मारिया बार्टोमेऊ यांनी टि्वट करून मेस्सीला पाठिंबा दर्शवलाय. 'मेस्सी जे तुझ्यावर आरोप करत आहेत ते बार्सिलोनाच्या इतिहासावर हल्ला करत आहेत. आम्ही शेवटपर्यंत तुला पाठिंबा देऊ' असे जोसेफ यांनी म्हटले आहे.