...तर `बीसीसीआय`चे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना जेल
ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टाने शपथपूर्वक खोटी साक्ष दिल्याचं सिद्ध झाल्यास त्यांना काही दिवस जेल होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने 'बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना वारंवार कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी फटकारलं आहे. ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टाने शपथपूर्वक खोटी साक्ष दिल्याचं सिद्ध झाल्यास त्यांना काही दिवस जेल होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा अंतिम आदेश 2 किंवा 3 जानेवारीला येऊ शकतो. बीसीसीआयच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करुन भारतीय क्रिकेटचा कारभार अन्य कुणा सक्षम अधिकाऱ्याच्या हातात द्यायचा की नाही, याचा निर्णय मात्र सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे.
सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला प्रशासकीय पॅनेलसाठी नावं सुचवण्यासाठी एक आठवड्याचा अवधी दिला आहे. अॅमिकस क्युरीनी त्यासाठी गृहविभागाचे माजी सचिव जी. के. पिल्ले, माजी कसोटीवीर मोहिंदर अमरनाथ आणि कॅगचे प्रतिनिधी विनोद राय यांची नावं सुचवली आहेत.