नवी दिल्ली : लोढा समितीने सुचविलेल्या सुधारणावर आज बीसीसीआय सुप्रीम कोर्टात उत्तर दिलं आहे. भारतीय क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी लोढा समितीची स्थापना करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या समितीने काही शिफारशी सुचवल्या होत्या. त्यापैकी बीसीसीआयच्या पदाधिकारी सत्तर वर्षापेक्षा जास्त नको, एक राज्य एक व्होट, निवड समितीत पाचऐवजी तीनच सदस्य असावेत अशा सुधारणा लोढा समितीने सुचवल्या होत्या.


लोढा समितीनं आपला अहवाल कोर्टात सादर केला होता. त्यापैकी अनेक शिफारशी या बीसीसीआयला मान्य नाहीत. यातल्या शिफारशी बीसीसीआयनं मतदानानं फेटाळल्या आहेत, असं बीसीसीआयनं कोर्टात सांगितलं आहे.


दरम्यान आपण पाठवलेल्या मेलचा बीसीसआयने नीट अभ्यास न करताच खाती गोठवण्याच्या शिफारशीचा अर्थ काढला गेला असं लोढा समितीनं म्हणलं आहे.