मुंबई: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आली. चेतेश्वर पुजाराला टीम इंडियात स्थान टिकवण्यात यश आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र दुसरीकडे दुलीप करंडकात उत्तम कामगिरीद्वारे लक्ष वेधून घेणाऱ्या गौतम गंभीरला टीम इंडियात अजूनही स्थान मिळालेलं नाही.


टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के एल राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, शिखर धवन, आर अश्विन, रिद्धीमन साहा, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, उमेश यादव, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा


टीम इंडियाचं नेतृत्व विराट कोहलीकडे आहे, तर उपकर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर असेल. 


भारतात होणाऱ्या या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. तर शिखर धवनवरही निवड समितीने विश्वास दाखवला आहे.


संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत टीम इंडियाची निवड करण्यात आली.