पुणे : यंदाच्या आयपीएलमधला सगळ्यात महागडा खेळाडू बेन स्टोक्सनं शानदार सेंच्युरी लगावत गुजरात लायन्सविरुद्धच्या मॅचमध्ये पुण्याला जिंकवून दिलं आहे. स्टोक्सनं 63 बॉल्समध्ये 103 रन्सची खेळी केली आणि पुण्याला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

162 रन्सचा पाठलाग करताना पुण्याची अवस्था 4 आऊट 42 अशी झाली होती. पण बेन स्टोक्सला धोनी(27) आणि ख्रिश्चननं(17) साथ दिली आणि एक बॉल बाकी असताना पुण्याचा विजय झाला.


या मॅचमध्ये टॉस जिंकून पुण्यानं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि गुजरातला 161 रन्सवर रोखलं. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये 12 पॉईंट्ससह पुणे चौथ्या क्रमांकावर आहे. पुण्यानं 10 मॅचमध्ये 6 विजय मिळवले आहेत.