एकही रन न देता घेतल्या 6 विकेट
बंगालचा ऑफ स्पिनर रितीक चॅटर्जीनं डिव्हिजनमधल्या दोन दिवसीय मॅचमध्ये आगळावेगळा विक्रम केला आहे.
कोलकता: बंगालचा ऑफ स्पिनर रितीक चॅटर्जीनं डिव्हिजनमधल्या दोन दिवसीय मॅचमध्ये आगळावेगळा विक्रम केला आहे. भवानीपूर क्लबकडून खेळताना रितीकनं मोहम्मदन स्पोर्टिंगच्या सहा खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, ते ही एकही रन न देता.
या मॅचमध्ये बंगालचा 253 रननी विजय झाला आहे. रितीकनं आपल्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या बॉलवर विकेट घेतली. त्यानंतर त्यानं आपल्या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या आणि सहाव्या बॉलला विकेट घेतली.
त्यानंतर तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर त्यानं भवानीपूर क्लबच्या दहाव्या बॅट्समनला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, आणि आपली टीम भवानीपूर क्लबचा विजय निश्चित केला.
रितीक चॅटर्जीच्या फिरकीपुढे मोहम्मदन स्पोर्टिंग टीम 13.2 ओव्हरमध्ये 37 रनवर ऑलआऊट झाली. त्याआधी भवानीपूर क्लबनं 83.5 ओव्हरमध्ये 290 रन बनवले होते.