टेनिसप्रेमी ग्रास कोर्टवर अनुभवणार कांटे की टक्कर
टेनिस सीझनमधील चार ग्रँडस्लॅमपैकी अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणा-या विम्बल्डनमध्ये टेनिसपटूंचा चांगलाच कस लागणार आहे. जोकविचचं आव्हान मोडण्यासाठी मरे आणि फेडरर प्रयत्नशील असेल. तर सेरेना आपलं 22 वं ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या उद्देशआनचं टेनिसकोर्टवर उतरेल.
लंडन : टेनिस सीझनमधील चार ग्रँडस्लॅमपैकी अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणा-या विम्बल्डनमध्ये टेनिसपटूंचा चांगलाच कस लागणार आहे. जोकविचचं आव्हान मोडण्यासाठी मरे आणि फेडरर प्रयत्नशील असेल. तर सेरेना आपलं 22 वं ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या उद्देशआनचं टेनिसकोर्टवर उतरेल.
256 टेनिसपटू..... 19 टेनिस कोर्ट... पुढचे दोन आठवडे टेनिसपटूंसमोर एकच लक्ष्य असेल आणि ते म्हणजे विम्बलडनची ट्रॉफी उंचावण्याचं..... गेल्या वर्षीय सर्बियन जायंट नोव्हाक जोकोविचनं विम्बल्डनला गवसणी घातली होती. आणि त्यानंतर त्यानं अमेरिकन ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंचन ओपनवर कब्जा केला होता. गेल्या 84 मॅचेसमध्ये त्यानं केवळ सहाच मॅचेस गमावल्यात. त्यामुळे त्याला रोखण्याचं आव्हान हे ब्रिटनच्या अँडी मरे आणि रॉजर फेडररसमोर असेल.
स्पॅनिश जायंट राफाएल नदालला दुखापतीमुळे विम्बल्डनला मुकाव लागलंय. तर पाठिच्या दुखापतीतून सावरत स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आपल्या आवडत्या ग्रासकोर्टवर आपली जादू दाखवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
वुमेन्स सिंगल्यमध्ये अमेरिकेची अव्वल सीडेड सेरेना विल्यम्स सेंटर ऑफ अट्रॅक्शन असेल. आपल्या टेनिस करिअरमधील 22 वं ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी सज्ज आहे.
भारताच्या सगळ्या आशा या सानिया मिर्झा आणि लिअँडर पेसवर असणार आहेत. आगामी ऑलिम्पिकसाठी भारतीय टेनिसपटूंना विम्बल्डनमध्ये चांगली कामगिरी करून दाखवावीच लागेल.
ग्रास कोर्टवरच्या लढाईत जोकोविच आपलं टायटल कायम राखतो की, फेडरर आणि अँडी मरे त्याला रोखण्यात यशस्वी होणार याकडेच तमाम टेनिस चाहत्यांच लक्ष असेल.