क्राईस्टचर्च: न्यूझिलंडचा कॅप्टन ब्रेंडन मॅक्कलम आपल्या शेवटच्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये 25 रनवर आऊट झाला. पण दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅक्कलम जेव्हा मैदानात आला तेव्हा न्यूझिलंडचा स्कोर 3 विकेटवर 72 रन होता. शेवटच्या इनिंगमध्ये खेळणारा मॅक्कलम काही चमत्कार करेल अशी न्यूझिलंडला आशा होती पण तसं काही झालं नाही. 27 बॉलमध्ये 25 रन बनवून मॅक्कलम आऊट झाला. 


तिसऱ्या दिवसाच्या शेवटी न्यूझिलंडनं 4 विकेटच्या मोबदल्यात 121 रन बनवल्या आहेत. फॉलो ऑन वाचवण्यासाठी न्यूझिलंडला आणखी 14 रनची आवश्यकता आहे. केन विलियमसन 45 आणि कोरे अंडरसन 9 रनवर खेळत आहे. 


ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 505 रनचा डोंगर उभारून 135 रनची आघाडी घेतली होती.