नवी दिल्ली : बॅडमिंटन विश्वातील नंबर वन महिला कॅरोलिना मरिन सध्या बॅडमिंटन प्रीमियर लीगच्या निमित्ताने भारतात आलीये. रिओ ऑलिम्पिक २०१६मध्ये मरिनने सिंधूला हरवत सुवर्णपदक जिंकले होते. मात्र त्यानंतरही मरिनपेक्षा सिंधूनेच सर्वांचे मन जिंकले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधूने ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर विविध स्तरातून तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. सिंधूला मिळालेल्या बक्षिसाची रक्कम ऐकून मरिनही हैराण झालीये. 


स्पेनमध्ये असे काही घडत नाही. इथे सगळ वेगळं आहे. मी सुवर्ण जिंकले तर सिंधूने रौप्य. मात्र मला हे ऐकून आश्चर्य वाटले की तिच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षिसांचा वर्षाव झाला. मलाही सुवर्णपदक जिंकल्यानंतर बक्षिस म्हणून काही रक्कम मिळालीये. मात्र त्याची तुलना सिंधूच्या रकमेशी केली जाऊ शकत नाही. मला मिळालेली रक्कम सिंधूला मिळालेल्या रकमेच्याजवळही जाणार नाही. 


रिओमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मरिनला त्यांच्या सरकारकडून ९४००० युरो(साधारण ६८ लाख रुपये) मिळालेत. तर दुसरीकडे सिंधूला तब्बल ६५ कोटींचे बक्षिस मिळालेय. 


मरिन पुढे म्हणाली, खरंच येथे येऊन मला चॅम्पियन असल्याचे जाणवतेय. भारतात खेळाडूंना मोठा सन्मान मिळतो. मला भारतात जितकी प्रसिद्धी मिळाली तितकी कुठेच नाही.