हैदराबाद : बांग्लादेशविरुद्धच्या एकुलत्या एक टेस्ट मॅचआधीच भारताला धक्का बसला आहे. लेग स्पिनर अमित मिश्रा दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याच्याऐवजी चायनामन बॉलर कुलदीप यादवची निवड करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी20 सीरिजवेळी अमित मिश्राच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डावखुरा कुलदीप यादव हा उत्तर प्रदेशकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळतो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कुलदीपनं 22 मॅचमध्ये 81 विकेट घेतल्या आहेत. मागच्या दोन सिझनमध्ये यादवनं अनेक बॅट्समनना त्याच्या गुगलीमुळे हैराण केलं होतं. याआधी कुलदीपची वनडे टीममध्ये निवड झाली होती, पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती.