मुंबई : आयपीएलच्या नवव्या सीझनमध्ये पहिल्याच सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रायजिंग पुणे सुपरजायंट संघाने गतविजेत्या मुंबई इंडियन्सल हरवत विजयी सलामी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयाचे अधिकतर श्रेय धोनीने गोलंदाजांना दिलेय. या विजयामुळे धोनी चांगलाच खुश आहे. मला नाही वाटतं यापेक्षा चांगली सुरुवात असूच शकत नाही. गोलंदाजांना याचे अधिक श्रेय जाते. विशेषकरुन रजत भाटिया. त्याने चांगली गोलंदाजी केली, असे धोनी म्हणाला. 


जेव्हा कमी धावांचे आव्हान असते तेव्हा फलंदाजांवर दबाव येत नाही. रहाणे आणि डु प्लेसिसने चांगली फलंदाजी करत हे आव्हान सोपे केले. जर सुरुवातीला विकेट पडल्या असत्या तर थोडे कठीण झाले असते, असे विजयानंतर धोनी म्हणाला.


या सामन्यात चमकला तो मुंबईकर अजिंक्य रहाणे. त्याने या सामन्यात ४४ चेंडूत नाबाद ६६ धावांची खेळी केली.