मुंबई : कसोटी क्रिकेटनंतर वन-डे क्रिकेट त्यानंतर टी-२० क्रिकेट असा बदल होत गेला. त्याप्रमाणे तसे नियमही केले गेलेत. आता नव्याने नियम तयार करण्यात आले आहेत. हे नवे नियम आता ऑक्टोबरपासून आमलात येण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेरिलबोर्न क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसीने नवे नियम जाहीर केले आहेत. हे नियम ऑक्टोबरपासून लागू होणार असल्याने क्रिकेटची मजा आणखी वाढणार आहे, असे वृत्त 'मुंबई मिरर'ने त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे.


काय आहेत हे नियम?


- धाव घेताना बॅटसमनने बॅट न टेकवता क्रीझ ओलांडली तर त्याला आऊट करता यायचे. कारण क्रीझमध्ये आल्यानंतर बॅट टेकवणे आवश्यक होते. यासाठी अनेक बॅटसमनना बराच त्रास होत होता, ही गोष्ट लक्षात घेऊन नवा नियम करण्यात आला आहे. 


- नव्या नियमानुसार बॅटसमनने क्रीझ ओलांडली तरी तो सुरक्षित असेल त्याला बॅट टेकवण्याची गरज नाही.


- एखाद्या क्रिकेटपटूने गैरवर्तणूक केली तर त्याला त्या सामन्यासाठी किंवा थोड्या वेळासाठी निलंबित करण्याचे अधिकार पंचांना असणार. हा नियम फुटबॉल खेळातून घेण्यात आलाय.


- बॅटची रूंदी, जाडी किती असावी यावर बंधन असणार. बॅट१०८ मिलिमीटर पेक्षा रूंद नसावी आणि त्याची जाडी ६७ मिलीमीटर पेक्षा जास्त नसावी असा नवा नियम 


- बॅटची कडा ही ४० मिलीमीटर पेक्षा जास्त नसावी असंही सांगण्यात आलं आहे.


- फलंदाजाला जखमी करण्यासाठी क्रीझची मर्यादा ओलांडून गोलंदाज नो बॉल मुद्दा टाकतात. अशा गोलंदाजांना लगाम लावण्यासाठी देखील नियम


- फलंदाजाला जखमी करण्याच्या दृष्टीने नो बॉल मुद्दाम टाकण्यात आला तर तो बिमर समजला जाईल आणि त्या गोलंदाजाला दंडही भरावा लागेल.


हे नवीन नियम तयार करण्यासाठी जी समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीमध्ये माजी कर्णधार सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टींग यांचा समावेश होता.