मुंबई: क्रिकेटला सर्वस्व मानणाऱ्या खेळाडूंना जेव्हा मैदानात हार पत्करावी लागते तेव्हा त्यांना दु:ख होण स्वाभाविक आहे. पण बरेच वेळा या क्रिकेटपटूंना मैदानामध्येच अश्रू अनावर होतात. अशाच काही क्रिकेटपटूंवर एक नजर टाकूयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


 


 


इंझमाम उल हक



2007 च्या वर्ल्ड कपमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली शेवटची मॅच खेळल्यानंतर इंझमामला अश्रू अनावर झाले.


एस. श्रीसंत



2008 च्या आयपीएलवेळी हरभजन सिंगनं श्रीसंतच्या कानाखाली मारली, तेव्हा श्रीसंतला रडू कोसळलं. 


विराट कोहली



2012 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात येत असताना विराट कोहली मैदानातच रडला.


बांग्लादेश 



2012 मध्ये आशिया कप जिंकायचं स्वप्न भंगल्यानंतर सगळ्या बांग्लादेश टीमला अश्रू अनावर झाले. 


युवराज सिंग



2011 चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर युवराजचे आनंदाश्रू


विनोद कांबळी



1996 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर विनोद कांबळी कोसळला


ए.बी.डिव्हिलियर्स



2015 वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगल्यानंतर ए.बी.डिव्हिलियर्सलाही रडायला आलं. 


सचिन तेंडुलकर



कारकिर्दितली शेवटची मॅच खेळल्यानंतर क्रिकेटच्या देवालाही अश्रू अनावर झाले. 


एम.एस.धोनी



2015 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर धोनीला रडू कोसळलं.