नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज डेव्हिड मिलरची आयपीएलच्या या सीझनमध्ये 'किंग्ज इलेवन पंजाब' संघाच्या कर्णधारपदी निवड झालीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिलर टी-२० फॉरमॅटमधील जबरदस्त क्रिकेटपटू आहे. तसेच तो याआधीही आयपीएलमध्ये या संघातून खेळलाय. डेव्हिड ही जबाबदारी चोख पार पाडेल आणि त्याच्या नेतृत्वाखील संघाला चांगले यश मिळेल असे संघाने प्रसिद्ध केलेल्या एका परिपत्रकात म्हटलेय. या निर्णयामुळे डेव्हिडनेही आनंद व्यक्त केलाय. तसेच ही इतकी मोठी जबाबदारी सोपवल्याबद्दल आभारही मानलेत. 


किंग्ज इलेवन पंजाब संघाचे प्रशिक्षक संजय बागड यांनीही या निर्णयावर आनंद व्यक्त केला असून डेव्हिड एक चांगला क्रिकेटपटू असल्याचे म्हटलेय. दबावातही दमदार फलंदाजी करण्याची त्याच्यात क्षमता आहे. त्याच्या या क्षमतेचा संघाला नक्कीच फायदा होईल, असे ते म्हणाले.