दिल्ली: दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा 10 रन्सनी पराभव झाला आहे. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या या मॅचमध्ये मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 ओव्हरमध्ये दिल्लीला 164 रनपर्यंत मजल मारता आली. दिल्लीकडून संजू सॅमसननं सर्वाधिक 60 रन केल्या, तर डुमनीनं 31 बॉलमध्ये 49 रन केल्या. मुंबईकडून मॅकलेनघननं सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. 


165 रनचा पाठलाग करायला आलेल्या मुंबईची सुरुवात यंदाच्या मॅचमध्येही खराब झाली. पार्थिव पटेल एक रनवर असताना रन आऊट झाला. त्यानंतर अंबाती रायडूनं रोहितबरोबर डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण 25 रनवर रायडूही आऊट झाला. कृणाल पांड्यानं 17 बॉलमध्ये 36 रनकरून मुंबईला विजयाजवळ आणलं पण त्याच्या विकेटनंतर मात्र मुंबईला सावरता आलं नाही.


शेवटच्या 2 ओव्हर बाकी असताना रोहित आणि पोलार्ड हे मुंबईचे दोन महत्त्वाचे बॅट्समन खेळत असतानाही झालेला हा पराभव मुंबईच्या चांगलाच जिव्हारी लागणारा आहे. रोहितनं या मॅचमध्ये 48 बॉलमध्ये 65 रन केल्या. दिल्लीकडून अमित मिश्रानं सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.