मुंबई : भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शामी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आलाय. त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद शामीने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहीलीये. त्यासोबतच एक फोटो शेअर केलाय. कबर खोदताना त्याचा फोटो आहे. 


त्यासोबत त्याने असं लिहिलंय की, 'स्वत:च्या वडिलांसाठी कबर खोदण्याचे दु:ख किती मोठे असते. हा क्षण फार कठीण असतो. मिस यू पापा आणि ज्या व्यक्तीने हा फोटो माझ्यापर्यंत पोहोचवलाय त्याचे धन्यवाद' असे शामीने या पोस्टमध्ये म्हटलंय,


शामीला हा फोटो त्याच्या एका चाहत्याने पाठवलाय. या वर्षी जानेवारीत मोहम्मद शामीच्या वडिलांचे निधन झाले होते.