हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याची मागणी
भारतीय महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची आज 111 वी जयंती आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये सलग तीन वेळा सुवर्ण पदक मिळवून देणारे मेजर ध्यानचंद यांना, हॉकीचे जादूगार म्हणूनच ओळखलं जातं.
मुंबई : भारतीय महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची आज 111 वी जयंती आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये सलग तीन वेळा सुवर्ण पदक मिळवून देणारे मेजर ध्यानचंद यांना, हॉकीचे जादूगार म्हणूनच ओळखलं जातं.
हॉकीच्या आपल्या अद्भूत शैलीनं, ध्यानचंद यांनी देशविदेशातली अनेक मैदानं गाजवली होती. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन भारत सरकारनं आता तरी त्यांना देशाच्या सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्कारानं गौरवावं अशी मागणी, करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून ओडिसाचे सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी, रविवारी दिल्लीत मेजर ध्यानचंद यांचं वाळूशिल्प साकारलं. त्याद्वारे भारतरत्न पुरस्कारानं ध्यानचंद यांचा गौरव करण्याचं आवाहनही केलं गेलं. यावेळी अनेक हॉकीपटू, तसंच ध्यानचंद यांचे चाहते उपस्थित होते.