कोलकता :  भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट सामन्यात इंग्लड विरूद्ध पाच धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. तरीही केदार जाधव आणि हार्दिक पांड्याचे कौतुक केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लडने प्रथम फलंदाजी करत ३२१ धावा केल्या. तर भारताने ५० षटकात ३१६ धावाच करता आल्या. भारताकडून केदार जाधव याने ७५ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकारासह ९० धावा केल्या. तर कोहलीने ५५ आणि हार्दिक पांड्या याने ५६ धावा केल्या. भारताने मालिका २-१ ने जिंकली. जाधव आणि पांड्या यांनी सहाव्या विकेटसाठी १०४ धावा जोडल्या. 


कोहलीने मॅचनंतर सांगितले की जाधव आमच्यासाठी चांगला शोध लागला आहे. गेल्या वर्षी आम्ही त्याचे समर्थन केले होते. तरी त्याला गेल्या वर्षी त्याला जास्त  संधी मिळाली नाही. पण जी पण संधी मिळाली त्याचे त्याने सोने केले. तो खेळाचे चांगल्या पद्धतीने आकलन करतो. हे खूप महत्त्वाचं आहे. हार्दिकही स्वतःला ऑलराउंडर म्हणून सिद्ध करत आहे.  हे पीच पाहिल्यावर लक्षात आले की ही चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी आहे.