नवी दिल्ली : पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या देवेंद्र झाझरियानं भाला फेकीत सुवर्णपदक पटकावलंय. 


भारताचं दुसरं गोल्ड 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या खात्यात आता दुसरं गोल्ड मेडल जमा झालंय. उंच उडीमध्ये मरिअप्पनला याआधी गोल्ड मेडल मिळालंय. 


देवेंद्रचं पॅरालम्पिकमधलं हे दुसरं गोल्ड मेडल आहे. त्यानं आपलाच २००४ चा अथेन्स पॅरालिम्पिकमधला ६२.१५ मीटर्सचा रेकॉर्ड मोडत  ६३.९७ मीटर या नव्या विश्वविक्रमाची नोंद केलीय.


दरम्यान, भारताच्या खात्यातील एकूण पदकांची संख्या ४ झालीय. यात २ गोल्ड, एक सिल्व्हर आणि एक ब्रॉन्झ आहे. 


...पण, त्यानं हार मानली नाही!


देवेंद्र आठ वर्षांचा असताना झाडावर चढताना त्याला शॉक लागला आणि त्याचा डावा हात कापावा लागला. पण या व्यंगावर मात करत त्यानं पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दाखवलंय. देवेंद्रच्या या यशानंतर त्याच्या राजस्थानमधल्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


आत्तापर्यंतची कामगिरी 


देवेंद्रनं २०१३ मध्ये आयपीएसी अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. याशिवाय, त्यानं या इव्हेंटमध्ये सिल्व्हर मेडलही पटकावलं होतं. २०१४ च्या एशियन गेम्समध्येही त्यानं सिल्व्हर मेडल पटकावलं होतं.