धवल आणि श्रद्धा

मुंबई : टीम इंडियाचा बॉलर धवल कुलकर्णी अखेर विवाहबंधनात अडकलाय. आपली मैत्रिण श्रद्धा खरपुडे हिच्यासोबत धवलचा विवाह पार पडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धवल आणि श्रद्धाचा विवाह सोहळा दक्षिण मुंबईच्या एका हॉटेलमध्ये पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीनं पार पडला. 


श्रद्धा ही एका फॅशन मॅगझीनशी निगडीत आहे. तिची आणि धवलची ओळख एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. दोघांच्या मैत्रीचं लवकरच प्रेमात रुपांतर झालं... आणि आता विवाहात...


या दोघांचा साखरपुडा गेल्या वर्षी मे महिन्यात पार पडला होता. विवाह समारंभानंतर रात्रीचं भोजन आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक क्रिकेटर आणि फॅशन जगतातील अनेक लोक सहभागी झाले होते.