मोहाली : महेंद्रसिंग धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 स्टम्पिंग घेणारा पहिला विकेट कीपर बनला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मोहालीतल्या तिसऱ्या वनडेमध्ये धोनीनं हा विश्वविक्रम केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहाली वनडेच्या 29 व्या ओव्हरमध्ये अमित मिश्राच्या बॉलिंगवर धोनीनं रॉस टेलरला स्टम्पिंगकरून धोनीनं हा रेकॉर्ड केला. यानंतर लगेचच 31 व्या ओव्हरमध्ये धोनीनं लुक राँकीला त्याचा 151वा बळी बनवलं. धोनीनं टेस्टमध्ये 38 आणि टी 20मध्ये 22 स्टम्पिंग केले आहेत.


धोनीला 150 स्टम्पिंग पूर्ण करण्यासाठी 444 मॅच लागल्या आहेत. स्टम्पिंग करण्यामध्ये धोनीनंतर श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा नंबर लागतो. संगकारानं 464 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 139 स्टम्पिंग केले आहेत. तर 234 मॅचमध्ये 101 स्टम्पिंग घेणारा श्रीलंकेचा कालुवैतरणा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानच्या मोईन खानला 277 मॅचमध्ये 93 स्टम्पिंग घेण्यात यश आलं. जगभरातला सर्वोत्तम विकेट कीपर समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ऍडम गिलख्रिस्टला 391 मॅचमध्ये 92 स्टम्पिंग घेता आले आहेत.