मोहाली : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं तीन विश्वविक्रम केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 स्टम्पिंग घेणारा धोनी पहिला विकेट कीपर ठरला आहे. तर याच मॅचमध्ये धोनीनं वनडे क्रिकेटमध्ये नऊ हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. नऊ हजार रन पूर्ण करणारा धोनी सतरावा बॅट्समन ठरला आहे. तर नऊ हजार रन आणि 50 पेक्षा जास्तचं बॅटिंग अॅव्हरेज असणारा धोनी एकमेव बॅट्समन आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे क्रिकेटमध्ये नऊ हजार रन करणारा धोनी पाचवा भारतीय ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि मोहम्मद अझरुद्दीनला हे रेकॉर्ड बनवण्यात यश आलं होतं. वनडे क्रिकेटमध्ये नऊ हजार रन करणारा धोनी तिसरा विकेट कीपर आहे. धोनीच्या पुढे कुमार संगकारा (13,341रन) आणि ऍडम गिलख्रिस्ट (9,410रन) आहेत.


याच मॅचमध्ये धोनीनं सचिन तेंडुलकरचा वनडे क्रिकेटमधला सर्वात जास्त सिक्स मारण्याचा भारतीय खेळाडूचाही रेकॉर्ड मोडला आहे. सचिनच्या वनडेमध्ये 195 सिक्स होत्या. सर्वात जास्त सिक्स मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये आता धोनी पाचव्या क्रमांकावर आहे.


वनडेमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे खेळाडू


शाहीद आफ्रिदी - 351 सिक्स


सनथ जयसुर्या- 270 सिक्स


क्रिस गेल- 238 सिक्स


ब्रॅन्डन मॅक्कलम- 200 सिक्स


एम.एस.धोनी- 196 सिक्स


सचिन तेंडुलकर- 195 सिक्स