मुंबई: भारताच्या वनडे आणि टी-२० टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची मैदानावरची रणनिती पाहून विरोधी टीम अनेक वेळा चक्रावून जाते. कॅच आऊट आणि स्टम्पिंगमध्ये धोनीचा हात कोणीच धरू शकत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या एका मॅचमध्ये धोनीची अफलातून विकेट किपिंग पाहायला मिळाली. युवराज सिंगच्या बॉलिंगवर जेकब ओरमनं पुढे जाऊन मारायचा प्रयत्न केला. पण ओरमच्या बॅटला एज लागून बॉल धोनीच्या हातात गेला. 


धोनीनं कॅच पकडला असला तरी ओरम क्रिजच्या बाहेर असल्यानं त्यानं स्टम्पिंगही केलं, आणि ओरम एकाच बॉलवर दोनवेळा आऊट झाला. 


धोनीच्या हातचलाखीचा हा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.