मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 12वीच्या पुढे शिक्षण घेऊ शकला नाही. मात्र तो शिक्षणात किती हुशार होता, त्याला किती मार्क्स मिळायचे याचा खुलासा धोनीने वीरेंद्र सेहवागच्या सेहवाग इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित कऱण्यात आलेल्या कार्यक्रमात केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेहवाग इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्याने याचा खुलासा केला. धोनीची अभ्यासात प्रगती साधारण होती. त्याला दहावीत असताना 66 टक्के मिळाले होते तर 12 वीत धोनीला 56 टक्के मिळाले होते. 


आपण अकरावीत गेल्यानंतर पहिल्यांदा क्लास लावला होता हेही धोनीने यावेळी नमूद केले. वर्गातच मन लावून अभ्यास करत असल्याने क्लासची तितकीशी गरज भासली नाही असेही धोनीने यावेळी सांगितले. यादरम्यान धोनीने मुलांना खेळ आणि अभ्यासाचा समतोल कसा राखायचा याच्या टिप्सही दिल्या.