नवी दिल्ली : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात भारताने बांगलादेशवर १ रन्सने मात केली. अखेरच्या षटकांत हार्दिक पंड्याने तीन विकेट घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिक बजावली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेरच्या षटकांतील तीन चेंडूत बांगलादेशला जिंकण्यासाठी दोन धावा हव्या होत्या. सगळ्या भारतीयांचा श्वास रोखून धरणारे असे हे तीन चेंडू होते. पहिल्या चेंडूत पंड्याने मुशफिकर रहीमला धवनकरवी बाद केले. त्यानंतर दोन चेंडूत दोन धावा अशी अवस्था होती. दुसऱ्या चेंडूत पंड्याचा शॉट खेळताना महमद्दुलाह बाद झाला. तिसऱ्या महत्त्वाच्या चेंडूत बांगलादेशला विजयासाठी दोन धावा हव्या होत्या. 


त्यावेळी धोनीने पंड्याला सांगितले, यॉर्कर टाकू नको. फक्त बॅक ऑफ दी लेंथने चेंडू टाक. तणावरहीत खेळण्यास सांगितले. आणि धोनीच्या सल्ल्याप्रमाणे पंड्याने गोलंदाजी केली. यात मुस्तफिझुरला धावबाद केले आणि भारताने रोमांचक सामन्यात विजय मिळवला.